ज्ञानदेवीच्या सुवर्ण शलाका (ज्ञानेश्वरी नित्यपाठ)
पावस (रत्नागिरी) येथे परमहंस स्वामी स्वरूपानंद एक थोर संत होऊन गेले. त्यांना आधुनिक काळातील ज्ञानेश्वर म्हटले जाते. त्यांनीकडून अभंग ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, भावार्थ गीता, गीतातत्त्वसार, संजीवनी गाथा आदि मौलिक ग्रंथांची रचना केली आहे. त्यांनी श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ सर्वसामान्यांसाठी रोजच्या वाचनासाठी उपलब्ध करुन दिला आहे. त्यात ज्ञानेश्वरीचे पुर्ण सार आले आहे. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ गहन । गुरूपुत्रासी सुगम सोपान भावे करितां श्रवण मनन । लाभे समाधान अखंडित ।” हे जाणून स्वामी स्वरूपानंदांचे अधिकारी शिष्य स्वामी विद्यानंद यांनी संक्षिप्त ज्ञानेश्वरी नित्यपाठ ग्रंथ संपादित केला आहे व हे सार आपल्या प्रवचन मालिकेमधून सर्वांना उलगडून सांगितले. त्यांच्या या 58 प्रवचनांचे संकलन म्हणजे ज्ञानेश्वरीच्या सुवर्ण शलाका हा प्रस्तुत ग्रंथ होय. त्यास परातत्त्वाचा स्पर्श आहे. भाषा अतिशय सोपी, रसाळ व ओघवती आहे. त्यामुळे वाचकांना ग्रंथ निश्चितच भावेल ! आवडेल !! व मार्गदर्शक होईल.
हा ग्रंथ सुबोध व हाताळण्यास सुलभ व्हावा म्हणून भाग-1 व भाग-2 अशा दोन भागांमध्ये तो ग्रथित केला आहे.
Reviews
There are no reviews yet.