जगावेगळे जीवनपुष्प – “अर्थात सावित्री (Jagavegle Jeevanpushpa)

400.00 240.00

जगावेगळे जीवनपुष्प “अर्थात सावित्री : श्री अरविंदांचे एक अपूर्व भावविश्व”
श्री अरविंदांच्या सर्व लेखनात सावित्री ह्या महाकाव्याचे एक अनन्य साधारण स्थान आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात पातिव्रत्याचा महिमा अधोरेखित करण्यासाठी शतकानुशतकापासून सत्यवान – सावित्रीची कहाणी सांगितली जाते. मानवी साधना व दैवी कृपा यांचे सामरस्य ह्या सत्यवान – सावित्रीच्या महाकाव्यातून श्री अरविंदांनी सांगितले आहे.
सावित्री ह्या मूळ इंग्रजी महाकाव्याचे 23800 चरण आहेत. स्वामी विद्यानंदांनी ह्या महाकाव्याचे मराठी भाषेत जगावेगळे जीवनपुष्प ह्या कादंबरी स्वरूपात स्वैर अनुवाद केला आहे.
सावित्रीच्या पारंपारिक कथानकावर आधारीत श्री अरविंदांनी अतिमानस तत्त्वज्ञानाची उभारणी केली आहे. मूळ तत्त्वज्ञान कायम ठेवून, मुळातील काव्यात्मक आशय कायम ठेवून त्यातील काव्यमयता गद्यात शब्दांकीत करणे हे अशक्य वाटावे असे कार्य स्वामीजींनी शक्य करुन दाखविले आहे.
प्रस्तुत कादंबरी म्हणजे योगिराज श्री अरविंदांचा पूर्णयोग आणि योगिराज श्री ज्ञानदेवांचा अमृतानुभवातील चिद्विलासयोग ह्यांचे मराठी प्रतिबिंब होय.

Weight 0.300 kg
Dimensions 8 × 5 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जगावेगळे जीवनपुष्प – “अर्थात सावित्री (Jagavegle Jeevanpushpa)”
Shopping Cart