अमृतधारा :- ‘ अमृतधारा ‘ ही पावस ( रत्नागिरी ) येथील श्रीस्वामी स्वरुपानंदांच्या साहित्य कृतीतील ‘ अक्षर वाड्मय ‘ म्हणून ओळखली जाईल अशी अलौकिक , काहिशी गहन , गूढ वाटावी अशी काव्य – कलाकृती आहे . या कलाकृतीत जी व्यापकता , समृध्दता , प्रगल्भता शिगोशिग भरुन राहिलेली आहे, ती समजून घेणं आणि त्यावर भाष्य करणं ही अतिशय अवघड अशीच गोष्ट आहे . श्रीस्वामी विद्यानंदजींनी हे अवघड काम आत्मविश्वासाने , अधिकारवाणीने केले आहे . श्रीस्वामी स्वरुपानंदांना साधनेतून गवसलेले संजीवक तत्वज्ञान श्रीस्वामी विद्यानंदजींनी खूप सोपे , सहज करुन प्रवचनातून समजावून दिले आहे . श्रीस्वामी स्वरुपानंदांची साधकावस्था ते सिध्दावस्था – असे झालेले परिवर्तन आकर्षकपणे श्रोत्यांपुढे मांडलेले आहे . त्यात मार्मिकता आहे . तत्वजिज्ञासा आहे . सत्त्यान्वेषण आहे ! आणि तरीही ते आकर्षक आणि अल्हाददायकही झालेले आहे …. ‘ अमृतधारा ‘ या ग्रंथावरील श्रीस्वामी विद्यानंदजींची ही प्रवचने वाचतांना वाचकही नक्कीच अंतर्बाह्य सुखावून जातील .
अमृतधारा (Amrutdhara)
₹50.00 ₹30.00

Reviews
There are no reviews yet.