सोहम साधना
आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचे आहे, त्याकरिता
आपण विविध प्रयत्न करतो. जसे, परीक्षा पास व्हायचे असेल तर अभ्यास
करतो. गाडी गाठायची असल्या सुहाना ची योजना करतो. विवाहा-
सारखे मोठे कार्य करायचे असल्यास खूपच शिस्तबद्ध व आखीव
स्वरूपाचा प्रयत्न करतो. अशाच प्रकारचा प्रयत्न ईश्वरप्राप्तीकरिता
सुद्धा करावा लागतो. ईश्वरप्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात जास्त
चिकाटीचा, यावर आधारित व सर्वस्व अर्पण करून करावा लागतो.
म्हणजेच ते एक प्रकारचे तप असते. व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने, निष्ठेने
व जिद्दीने हेतप करावे लागते. यालाच साधना असे म्हणतात. ह्या
तापाचे बाह्यस्वरूप जप, ध्यान इत्यादी पासून तो आपण करीत असलेले
सर्व कर्मजात इथपर्यंत असू शकते. पण आतील स्त्रोत मात्र तळमळीने
भारावलेला असतो. तळमळ अर्थातच ईश्वरप्राप्तीची असते.