आध्यात्मिक गुरु
स्वामी विद्यानंद
परमपूज्य स्वामी विद्यानंद यांचा जन्म १४ ऑक्टोबर 1924 साली , कोजागिरी पौर्णिमेला विदर्भात झाला. पूर्वाश्रमीचे नाव दा.के. पांडे . लहानपणापासूनच अध्यात्माची गोडी. लहानपणीच अनेक आध्यात्मिक अनुभव आलेत व देवादिकांची दर्शने झाली . घरच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना शालेय शिक्षणा नंतर नोकरी करावी लागली. जबलपूरला CDA ऑफिसमध्ये होते . 1956 ला बदली पुण्याला झाली. नोकरी करीत असतानाच बहिस्थ विद्यार्थी म्हणून महाविद्यालयीन शिक्षण घेतले . पॉलिटिकल सायन्स व सोशाॅलाॅजी या दोन विषयात M.A. झाले.
अध्यात्मिक उन्नतीसाठी सत्पुरुषाच्या मार्गदर्शनाची त्यांना खूपच ओढ होती. अखेर त्यांना पावस रत्नागिरी येथील परमहंस स्वामी स्वरूपानंद यांचा अनुग्रह लाभला व नाथ संप्रदायात त्यांचा प्रवेश झाला . भगवान शंकर, मच्छिंद्रनाथ , गोरक्षनाथ, गहिनीनाथ , निवृत्तीनाथ , ज्ञानदेव यांनी प्रवाहीत केलेल्या सोSहम् साधनेत स्वामीजी तल्लीन झाले.
दिव्य जीवन वाटिका आश्रम
फोटो गॅलेरी
ठिकाण
दिव्य जीवन वाटिका आश्रम
पुणे-सासवड रोड , वडकी गाव , हडपसर, पुणे, महाराष्ट्र
divyajeevan@swamividyanand.co.in